भारतीय किसान संघाचा महाराष्ट्रातील प्रांताचा अभ्यास वर्ग


भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांताचा अभ्यास वर्ग गोव्यातील म्हापसा-पणजी मार्गावरील पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी शिक्षा संकुल या वर्ग स्थानावर शुक्रवार  दि.४ नोव्हेंबर २०१६ ते रविवार दि.६ नोव्हेंबर २०१६ दरम्यान समाधानकारक रीतीने संपन्न झाला.
वर्गाच्या उदघाटन प्रसंगी प्रांताचे अध्यक्ष मा.श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुपे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.प्रांताचे मंत्री किशोर ब्रह्मनाथकर यांनी प्रास्तविक करताना अभ्यासवर्गाचे स्वरूप स्पष्ट केले.
उद्घाटनपर भाषणात प्रदेश संघटन मंत्री दादा लाड यांनी भारतीय किसान संघ या संघटनेची गरज विषद केली. बिगर राजकीय + सामुहीक नेतृत्व + राष्ट्र व्यापकता या मुख्य वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकून भारतीय किसान संघाची रचना व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.
उपस्थित १७० प्रशिक्षणार्थींचे सात गट त्यांच्या कार्यकालानुसार बनविण्यात आले. तीनही दिवशी प्रांताच्या ज्येष्ठ पदाधिकार्यांनी या गटांमध्ये जाऊन नेमून दिलेल्या सात विविध विषयांवर चर्चा घडवून आणली.
राष्ट्रीय सह संघटन मंत्री गजेंद्रसिंह यांनी "कार्यकर्ता" या विषयावर बौद्धिक व्याख्यान दिले. त्यामध्ये त्यांनी श्रीमद् भगवत गितेतील भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशावर आधारित ध्येयवादी कार्यकर्त्याच्या व्यक्तिमत्त्व,मन,कार्य व चारित्र्य या विषयीच्या जडण घडणीवर मार्गदर्शन केले.
उपस्थित प्रशिक्षणार्थींनी मोर्चा, आंदोलन,शिष्टमंडळ,निवेदन,चर्चा व बैठक या विषयांवर अभिरूप कार्यशाळा या सदरात नाट्यछटा सादर केल्या. राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. दिनेशरावजी यांनी भारतीय किसान संघाचे संस्थापक श्रद्धेय कै. दत्तोपंतजी ठेंगडी यांचे जीवन,कार्य,स्वभाव,साहित्य निर्मीती आदींवर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. दत्तोपंतांनी लिहीलेली ध्येयपथपर किसान, कार्यकर्ता, तिसरा पर्याय आणि प्रस्तावना ही पुस्तके वाचण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला दिला.
अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेशरावजी कुलकर्णी यांनी रविवार दि.६ रोजी,"भारतीय किसान -कल,आज और कल याविषयावरील बौद्धिक सादर करताना कृषिमित् कृषस्व हा संदेश देणाऱ्या वेदांवर आधारित शेती करताना काळानुरूप बदलांशी सांगड घालून प्रदूषणमुक्त शाश्वत,गोपालनाधारीत,सेंद्रिय शेती करण्याचे महत्त्व पटवून दिले. ग्रामव्यवस्था शेती केंद्रित झाली तरच ती परावलंबित्वातून बाहेर पडून स्वावलंबी होईल असे प्रतिपादन केले. सामुहिक व सहकारी शेती व प्रक्रिया उद्योग यांना पणन,निर्यात,उत्पादन खर्चाधारीत भाव,सहज व कमी खर्चात पतपुरवठा आदी बाबींवर शासनाने भर दिला पाहिजे म्हणजे शेती आणि शेतकरी भविष्यात सुखी होतील व समाजाला सुखी करतील अशा अर्थाचा संदेश दिला.या सर्व प्रक्रियांमध्ये भारतीय किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
भारतीय किसान संघाच्या कार्यकर्त्यांना तोंड द्यावे लागणारे महत्वाचे २० ते २५ प्रश्नांपैकी एका प्रश्नावर लिखीत भाष्य करण्यास सहभागी प्रतिनिधींना सांगितले असता सर्वांनी सकाररात्मक लेखी प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुपे यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सहभागी कार्यकर्ते व संयोजक यांचे अभिनंदन करताना कार्यकर्ता हा किसान संघाचा मजबूत पाया असून त्याची वाटचाल धिमी असली तरी शाश्वत slow but steady आहे असे प्रतिपादन केले.
महाराष्ट्र प्रांताचे महामंत्री बळीरामजी सोळंके,मंत्री किशोर ब्रह्मनादकर,विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री रमेश मंडाळे,कोषाध्यक्षृ मधुकरअण्णा टेमगिरे,संतोष पाटील,मिलींद भिसे,खंडेराव कुलकर्णी,सुभाष देशमूख,कुडेसर शाम पंधरकर आदि पांत व इतर पपदाधिकार्यांनी अभ्यास वर्गात सक्रिय सहभाग घेतला.
प्रांताचे मंत्री मदनराव देशपांडे यांनी सूत्र संचालन केले . प्रांताचे मंत्री श्रीरंग जांभळे व गोव्यातील कार्यकर्त्यांनी हा अभ्यासवर्ग उत्कृष्टपणे पारपाडण्यासाठी परिश्रम घेऊन संस्मरणीर प्रबंध व्यवस्था ठेवली होती.